ग्रामीणमहाराष्ट्र

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….* *येवल्यातील रोकडे हनुमान मंदिर परिसराच्या विकासासाठी १ कोटी ५० लाखांची विविध विकास कामे मंजूर*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….*

*येवल्यातील रोकडे हनुमान मंदिर परिसराच्या विकासासाठी १ कोटी ५० लाखांची विविध विकास कामे मंजूर*

*नाशिक,दि.२७ डिसेंबर :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन निधी सन २०२३- २४ अंतर्गत पर्यटन स्थळ विकास मुलभूत सुविधा अनुदान योजनेअंतर्गत येवला शहरातील रोकडे हनुमान मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात आला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन निधी सन २०२३ – २४ अंतर्गत पर्यटन स्थळ विकास मुलभूत सुविधा अनुदान योजनेअंतर्गत येवला शहरातील प्राचीन रोकडे हनुमान मंदिर परिसराराचा विकास करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये रोकडे हनुमान मंदिर परिसरात सभामंडप, बालसंस्कार केंद्र, योगा केंद्र, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, परिसर सुधारणा व सुशोभिकरण यासह विविध विकास कामे करण्यात येणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना विविध सुविधांचा लाभ मिळणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!