आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्राईमग्रामीण

जिल्हा परिषद शाळा येथे द बेबी केयर फाऊंडेशन यांच्या वतीने मोफत व्हील चेअर वाटप*

*जिल्हा परिषद शाळा येथे द बेबी केयर फाऊंडेशन यांच्या वतीने मोफत व्हील चेअर वाटप*

*सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*

वसई / साष्टिकर पाडा : वसई तालुक्यातील साष्टिकर पाडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे द बेबी केयर फाऊंडेशन तर्फे मोफत व्हील चेअर करण्यात आले.
द बेबी केयर फाऊंडेशन ही संस्था नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कार्यासाठी सदैव तत्पर असते. या फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर एलेक्स डेनियल हे समाजातील अपंग, कुपोषित बालक, गरजु निराधार महिला आणि शालेय विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी व मदत करण्यासाठी नेहमीच संघर्ष आणि हिरीरीने भाग घेत असतात. समाजसेवेच्या जोरावर द बेबी केयर फाऊंडेशन ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात वाखणण्यासारखी कामे करीत आहे.
दिनांक १ जूलै रोजी द बेबी केयर फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर एलेक्स डेनियल यांनी
गरीब आणि अपंग असलेल्या १० वर्षीय प्राची धनवते या मुलीला व्हीलचेअरचे वाटप केले.
प्राची धनवते, वय वर्षे १० ही मुलगी जन्मजात अपंग आहे , अतिशय हुशार रोज असलेल्या ह्या आपल्या मुलीला शाळेत ये जा करण्यासाठी तिच्या वडीलांना रोज तीला उचलून शाळेत आणावे लागत असे ही समस्या एलेक्स डेनियल यांच्या लक्षात येताच त्यांनी प्राची धनवते या मुलीला द बेबी केयर फाऊंडेशनच्या वतीने मोफत व्हीलचेअर देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक , मुलीचे वडील, द बेबी केयर फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर एलेक्स डेनियल स्वतः उपस्थित होते.
व्हीलचेअर मिळाली म्हणून मुलीचे वडील तसेच शाळेय शिक्षकांनी द बेबी फाऊंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि तिच्या वडिलांनी आजपर्यंत कोणीही व्हीलचेअरच्या रुपात मदत केली नाही. ती मदत द बेबी केयर फाऊंडेशनने पूर्ण केली म्हणून संस्थेचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!