ताज्या घडामोडी

. श्री. विठ्ठलराव कुमावत, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी यांचे दि. ९ / २/ २०२३ रोजी दुःखद निधन

कै. श्री. विठ्ठलराव कुमावत, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी यांचे दि. ९ / २/ २०२३ रोजी दुःखद निधन झाले. विठ्ठलराव कुमावत हे येवला पंचायत समितीचे कक्ष अधिकारी श्री. संजय कुमावत व द्रोणगिरी औषधालयाचे संचालक श्री. अजय कुमावत यांचे वडील होते. कै. विठलराव कुमावत यांनी सामाजिक, शैक्षणिक व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हातभार लावणे तसेच विविध धार्मिक कार्यात सहभागी होणे अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र विकास सेवेत कार्यरत असताना एक हुशार, अभ्यासू व सर्वांशी मनमिळाऊ पणे वागणारे एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. विठलराव कुमावत यांच्या जाण्याने परिसरात, नातेवाईक तसेच मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!