लासलगाव एचपी गॅस एजन्सी ठेकेदारांकडून गॅसधारकांची दिशाभूल करून पैसे वसुली……
संपादक राहुल वैराळ

घरगुती गॅस कनेक्शन चे सर्वे करण्याच्या माध्यमातून जोर जबरदस्तीने इन्शुरन्स च्या नावाखाली 232 रुपये प्रति कनेक्शन वसुली या एजन्सी मार्फत सुरू असल्याच्या तक्रारी येत आहे ज्या गॅस ग्राहकाने याबाबत नकार दिल्यास तुमचे गॅस कनेक्शन कायमस्वरूपी बंद होइल असे एजन्सीचे गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी महिला वर्गाशी बोलत आहे याबाबत शेकडो महिलांसह नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती दिली
प्रत्येक घरोघरी जाऊन गॅस कनेक्शन चेक करून इन्शुरन्स काढला जात असल्याची चुकीची माहिती दिली जात आहे परंतु लासलगाव पंचक्रोशीतील सर्व गॅस धारक यांच्याशी संबधित ठेकेदाराकडून गुंडगिरीची वागणूक केली जात आहे व घरातील गॅस कनेक्शन चेक न करता जेष्ठ नागरिकांशी अरेरावीची भाशा वापरून 232 रुपये घ्यायचे आणि एक फार्म भरायचा आणि भरला नाही तर तुमच गॅस कनेक्शन बंद होईल आणि पुढील महिन्यापासून तुम्हाला गॅस टाकी मिळणं बंद होईल अस सांगायचं आणि घरातील महिलांची ज्येष्ठ नागरिकांची बळजबरीने हा फार्म भरावाच लागेल अशी जबरदस्ती करून फसवणूक केली जात आहे. कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स न काढता गॅस कनेक्शन चेक न करत असा प्रकारे फार्म भरून घेण्याचा सपाटा ठेकेदाराने पूर्ण लासलगाव पंचक्रोशी सुरू होता त्याच्या विरोधात
पंचक्रोशीतील गॅस ग्राहकांनी व नागरिकांनी आज अन्याया विरोधात आवाज उठवला आणि सर्व गॅस धारक लासलगाव पोलीस स्टेशन ला जमा झाले व घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, ठाणे अमलदार संदीप शिंदे ,पोलीस हवालदार कैलास महाजन यांना दिली
ह्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, निलेश काळुंखे, राजाभाऊ चाफेकर,मयूर झांबरे,दिनेश जोशी,गोटूशेठ बकरे, केशवराव जाधव, गणेश जोशी ,संदीप निकम ,सोमनाथ गांगुर्डे सुभाष बोराडे मधुकर गावडे, सतीश पवार,अनिल शेजवळ, सोनू मोरे यांसह महिला भगिनी तसेच गॅस ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते