ताज्या घडामोडी

आरटीई २५ % आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ इयत्ता १ली साठी येवला तालुक्यात २६६ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी

*आरटीई २५ % आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ इयत्ता १ली साठी येवला तालुक्यात २६६ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी..*
दरवर्षी प्रमाणे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल , वंचित , शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याकरिताची प्रक्रिया दि. १६/०४/२०२४ पासून ते दि. ३०/०४/२०२४ पर्यंत सुरु आहे.त्यात येवला तालुक्यात आरटीई २५% अंतर्गत न.पा. शाळा , जिल्हा परिषद शाळा , खाजगी अनुदानित शाळा , जिल्हा परिषद शाळा (माजी शासकीय) , कटक मंडळ शाळा , स्वयं अर्थसहाय्यित शाळा , पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) मध्ये २५% दुर्बल , वंचित , शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे २६६ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी आहे, असे गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर पंचायत समिती येवला यांनी सांगितले.
सदर २६६ शाळांची यादी पंचायत समिती येवला (शिक्षण विभाग) येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
*प्रवेशासाठी निकष:
१.पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा.
२.जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार येवला यांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला).
३.पालकाचा रहिवासी पुरावा.
४.अपंगत्वाचा पुरावा.
५. बाळाचे व पालकाचे आधार कार्ड व इ.कागद पत्रासह पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!