ताज्या घडामोडी

राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शतायुषी बाबांना अभिष्टचिंतन

हेडिंग
राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शतायुषी बाबांना अभिष्टचिंतन

राष्ट्रीय किसान दिनानिमित्त श्री. कारभारी शंकर पवार भाडगाव येथे ते शंभर वर्षे पूर्ण केलेल्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.आदर्श शेतकरी म्हणून बाबांचा येथे यथोचित गौरव करण्यात आला. राष्ट्रीय किसान दिन भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा केला जातो.या राष्ट्रीय किसान दिन व शतायुषी अभिष्टचिंतन सोहळानिमित्ताने जवळपास एक हजार शेतकरी पुरुष व महिला एकत्र आले होते. किसान दिनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी उद्घाटक म्हणून श्री अंबादासजी बालाजी बनकर यांनी आपले विचार व्यक्त केले, आजच्या सध्या परिस्थितीनुसार आधुनिक शेती सोबत शाश्वत योगिक शेती कशी करावी, शेतकऱ्याने आशावादी राहून कुठल्याही परिस्थितीत हार खाऊ नये व आत्महत्या सारख्या घटना कधीही घडू नये, निर्व्यसनी जीवन व संपूर्ण सकारात्मकता हे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा मूलमंत्र आहे,याविषयीचे संपूर्ण सखोल मार्गदर्शन राजयोगिनी ब्रह्माकुमारी नीतादीदी येवला सेवाकेंद्र संचालिका यांनी केले यावेळी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयाच्या ग्रामविकास प्रभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येवला सेवाकेंद्राच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी अनुराधा दीदी व दामिनी दीदी याही या प्रसंगी उपस्थित होत्या.
श्री.कारभारी पवार यांची यांच्या वजनाइतके गुळाच्या भेल्या दान करण्यात आल्या. मान्यवरांची भाषणे झाली. आपल्या वडिलांविषयीचे हृदयस्पर्शी विचार श्री.माधव कारभारी पवार यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी येवला तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. कारभारी पवार यांचे मुले व नातू यांनी केले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!