ताज्या घडामोडी

ढासला गावातील भोंगे कायम ठेवणार! ग्रा. पं. चा ठराव : भोंगे ही जीवनशैली बदनापूर/प्रतिनिधी तालुक्यातील मौजे ढासला पिरवाडी येथे मशीदीवरील भोंगे उतरू न देण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे. मशीदीवरील भोंगे म्हणजे आमची जीवन जगण्याची शैली आहे, असा सूर गावकऱ्यांतून निघाला.

ढासला गावातील भोंगे कायम ठेवणार!

ग्रा. पं. चा ठराव : भोंगे ही जीवनशैली

बदनापूर/प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे ढासला पिरवाडी येथे मशीदीवरील भोंगे उतरू न देण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे. मशीदीवरील भोंगे म्हणजे आमची जीवन जगण्याची शैली आहे, असा सूर गावकऱ्यांतून निघाला.

रविवार दि.२४ एप्रिल रोजी पंचायतराज दिनानिमित्त मौजे ढासला पिरवाडी येथे ग्रामसभा घेण्यात आली. सदर ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करून एकमताने उपरोक्त ठराव घेण्यात आला आहे. याठिकाणी सामाजिक वातावरण सलोख्याचे व चांगले आहे. ग्रामपंचायतच्यावतीने व सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही गावातील मस्जिद वरील भोंगे आम्ही काढू देणार नाही व कळवणारही नाही, कारण आम्हाला त्यापासून कसलाही त्रास नाही.

अजान म्हणजे गावकऱ्यांची एक जीवनशैली बनलेली असून त्यामुळे इतर समाजातील गावकऱ्यांना दैनंदिन

उपक्रम चालू असतो. सकाळी यांच्या आवाज येतो त्यावेळी सर्व आबालवृद्ध त्यानिमित्ताने जाग येऊन आपापले दैनंदिन कामाची सुरुवात करतात. जसे की सकाळची अजान झाल्यावर रोजाने कोण गावातील मंडळी उठून दैनंदिन कामाला सुरुवात करतात. तसेच दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतातील काम करणारी मंडळी जेवणासाठी थांबतात. पुन्हा संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर मजुरांना कामावरून सुट्टी दिली जाते. सायंकाळच्या नमाजीनंतर जेवण करतात व साडेआठच्या नमाजीनंतर झोपतात, असे यावेळी गावकरी यांनी सांगितले. त्यामुळे भोंगे बंद झाल्यावर आम्हाला करमणार नाही, परिणामी आम्ही भोंगा

बंद होऊ देणार नाही. अजान म्हणजे आमची गावकऱ्यांची दैनंदिन जगण्याची जीवन शैली बनलेली आहे. त्यामुळे आम्ही आमची मशीदीवरील भोंगे काढू देणार नाही, असे अठरापगड जातीतील हिंदू समाजातील गावकऱ्यांनी सांगितले. आमच्या गावामध्ये सर्व-धर्मसमभाव दृष्टिकोनातून जातीभेद केला जात नाही. प्रत्येकांच्या सणांमध्ये, सुख दुःखांमध्ये गावकरी एकत्र येतात. त्यावेळी मोलाना जाहीर वे गुलजार वेग मिर्झा यांनी तरीही आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंगे सुरु ठेवू, असे उद्गार काढले.

वरीलप्रमाणे ठराव ग्रामसभेमध्ये एक मुखाने पारित करण्यात आला. वावेळी सरपंच राम पाटील, उपसरपंच विजय पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य कैलास पाचे, अण्णा कदम, कदीर शेख, कौशल्याबाई गडगिळे, ग्रामसेवक पी. के. सरनाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, कदिरभाई शेख, अयुबभाई, मस्जिदचे अमीर हुसेनभाई पठाण, जिजा कदम यांच्यासह इतर गावकरी उपस्थित होते.

Sma

Para No d

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!