आरोग्य व शिक्षण

20 बेड फिल्ड हॉस्पिटल इमारतीचे केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री भारतीताई पवार यांचे हस्ते उदघाटन*

*20 बेड फिल्ड हॉस्पिटल इमारतीचे केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री भारतीताई पवार यांचे हस्ते उदघाटन*
पोलिस टाईम्स न्युज: सुनिलअण्णा सोनवणे
*चांदवड*: उपजिल्हा रुग्णालयात आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते 20 बेडचे फिल्ड हॉस्पिटल या इमारतीचे उदघाटन मोठ्या थाटामाटात झाले.मात्र चांदवड उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या काही महिन्यांपूर्वीच्या घटना लक्षात घेता पुढचे पाठ मागचे सपाट…. अशी परिस्थिती झाली आहे कारण प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी 1 महिन्यांपूर्वी व्हेंटिलेटर उपलब्धता,डॉक्टर उपलब्धता या प्रश्नांना वाचा फोडली होती. याबाबत आज मात्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार या काहीच बोलल्या नाहीत.काही महिन्यांपूर्वी मोरे नामक बालिकेला सर्पदंश झालेला होता तिला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती मात्र चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील 25 व्हेंटिलेटर आजही बंद अवस्थेत आहेत याकडे कोण लक्ष देणार?असा प्रश्नच नागरिकांना पडलाय.
ट्रामा केअर सेंटर आजही बंद अवस्थेत आहे. या ठिकाणची मालकी आता मोकाट कुत्र्यांनी घेतली असून याठिकाणी अजूनही स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होत नाहीत अशी दुरावस्था रुग्णालयाची असताना 20 बेडची इमारत बांधली खरी मात्र डॉक्टर उपलब्ध होतील का? व वेळेवर रुग्णांचे प्राण वाचतील का? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी मागील 30 ते 35 वर्षात आरोग्य विभागात किती बेडची उपलब्धता झाली व या दोन वर्षात मंत्री महोदयांच्या काळात किती बेडची उपलब्धता झाली यासंदर्भात सांगितले परंतु सदर हॉस्पिटल मध्ये किती डॉक्टर्स या ठिकाणी वाढविले ? हाच एक संशोधनाचा भाग होऊ शकतो.
मंत्री महोदय डॉक्टर आपण सुद्धा एक डॉक्टरच असून सुद्धा 24/7 डॉक्टर म्हणून सेवा देऊ शकतात काय ? अखेर डॉक्टर सुद्धा मानवच आहेत. प्रत्येक प्रकारातील स्पेशालिस्ट एकच डॉक्टर सलग सात दिवस सेवा कशी बरे देईल.? त्यामुळे प्रत्येक विभागाचे दोन ते तीन डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत तेव्हा कुठे आरोग्याची सेवा शंभर टक्के दिली असे म्हणता येईल. फक्त बेडची संख्या वाढवून व बिल्डिंग बांधून काहीच उपयोग नाही. या ठिकाणी डॉक्टरांची संख्या सुद्धा वाढवली पाहिजे तेव्हाच कुठे आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य तसेच या शासकीय रुग्णालयांचा दर्जाच सुधारेल.
एकच डॉक्टर सलग सात दिवस
सेवा कशी देईल याचे उत्तर स्वतः डॉक्टर असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी द्यावे त्यामुळेच प्रत्येक विभागाला किमान दोन ते तीन डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध व्हावे ही मागणी चांदवडकर करत आहे. सदर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम आर आय डिजिटल एक्स-रे, या व अशा अनेक सुविधा उपलब्ध नाहीत याकडे मंत्री महोदयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!