कृषी व व्यापार

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती

नाशिक, दि. 30 जुलै, 2023 (जिमाका वृत्तसेवा :
नाशिक जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

महसूल विभागामार्फत जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्यावेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करुन महसुल वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, महसुल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी नाशिक जिल्ह्यात ..

*असा असेल ‘महसूल सप्ताह कार्यक्रम’*
मंगळवार, 1 ऑगस्ट, 2023 रोजी दिनांक 26 जानेवारी ते 30 एप्रिल, 2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “महाराजस्व अभियान” अंतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन विभागनिहाय उत्कृष्ट काम करणा-या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अवल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी , कर्मचारी म्हणून गौरव करुन सन्मान करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!