क्राईम

दरोडयातील आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी जेरबंद केले

दरोडयातील आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी जेरबंद केले

    जळगाव: प्रतिनिधी शाहिद खान         

जळगाव जिल्हयांत मोठया प्रमाणे मोटार सायकल वरील इसमांकडून लुटमार करण्याचे प्रकार घडत असल्याने मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना मोटार सायकल वरील नागरिकांना लुटणारे आरोपी निष्पन्न करुन त्यांचा शोध घेवून गुन्हे उघडकिस आणावे बाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पो. निरी. स्था. गु.शा. जळगाव यांनी मोटार सायकल वरील इसमांना लुटणारे गुन्हयांचे अवलोकन करुन तसेच सदर गुन्हयांचे घटनास्थळांचे तांत्रिक विश्लेषण केले.

त्याचप्रमाणे दि.०४/१२/२०२२ रोजी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पो. निरी. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखे कडील पोउनि. श्री. अमोल देवढे, पोउनि श्री. गणेश चोभे, सफी/ रवि नरवाडे, सफो/ अनिल जाधव, सफी/युनुस शेख पोहेकॉ / विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, अशरफ शेख, संदिप पाटील, दिपक पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, पोना/ किशोर राठोड, रणजित जाधव, नितीन बाविस्कर, प्रितमकुमार पाटील, विजय पाटील, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रविंद्र पाटील, परेश महाजन, पोकों/ विनोद पाटील, ईश्वर पाटील, दिपक शिंदे, उमेश गोसावी, चासफौ/रमेश जाधव, चाहेकाँ/ राजेंद्र पवार, भारत पाटील, चापोना / दर्शन ढाकणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी, प्रमोद ठाकुर तसेच मुक्ताईनगर पो.स्टे. चे पोउनि श्री. प्रदिप शेवाळे, पोहेकॉ गणेश मनोरे, पोना/मोतीलाल बोरसे, धर्मेंद्र ठाकुर, पोकों/राहुल महाजन, प्रशांत चौधरी, सतिष भारुडे, चापोना/ लतिफ तडवी अशांनी जळगाव शहरात विविध ठिकाणी संशयीत आरोपीचे शोध कामी छापे टाकलेले असता एमआयडीसी पो.स्टे. हद्दीत सुप्रिम कॉलनी मध्ये १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, २) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा. भिकनगाव जि. खरगौन (म.प्र.), ह.मु. रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, ३) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु.भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव यांना आज दि. ०४ / १२ / २०२२ रोजी १४.०० वा. शिताफिने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना एमआयडीसी पो.स्टे. ला चौकशी कामी आणले असता त्यांनी मुक्ताईनगर पो.स्टे. हद्दीत नरवेल रोडवर एका सोनारास लुटून त्यांचे जवळील सोन्या-चांदीचे दागिने हिसकविले आहे बाबत सांगितले असता सदर गुन्हयांत अजुन त्यांचे साथीदार ४) विशाल देविदास मराठे रा. रायपुर कंडारी ता. जळगाव, ५) विनोद विश्वनाथ इंगळे रा. उचंदा ता. मुक्ताईनगर हे सुध्दा असल्याचे सांगितले.
रवाना केले. आरोपी १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता.धुळे ह.मु.. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव याने कबुल केले की, मुक्ताईनगर येथे चोरी केलेले सोन्या- चांदीचे दागिने हे मी माझ्या घरात लपवून ठेवले असून गुन्हयांत वापरलेली मोटार सायकल ही माझ्या घरी उभी असल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे आरोपी १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कडून मुक्ताईनगर पो.स्टे. गु.र.नं.३९१/ २०२२ भादंवि क. ३९४ या गुन्हयांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयांत वापरलेल्या १ बजाज पल्सर मोटार सायकल काळया रंगाची एमएच १९ / ईबी १९४५ व ०१ होंडा शाईन मोटार सायकल क्र. एमएच १९/बीवाय ६३०५ हया दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ताब्यात घेतलेल्या १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, २) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा. भिकनगाव जि.खरगौन (म.प्र.), ह.मु.रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, ३) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव यांना अधिक विचारपुस करता त्यांनी कबुल केले की, त्यांनी सुमारे मागील ८ / ९ महिन्यात १) पळासखेडा ते बोदवड रोडवर, २) वराड ते विटनेर रोडवर, ३) लासगाव ते बांबरुड रोडवर, ४) वराड ते जळके रोडवर मोटार सायकल स्वार यांना अडवून त्यांचे कडून रोख रुपये व मोबाईल असे हिसकावून चोरी केल्याचे सांगितले.

त्याबाबत १) जामनेर पो.स्टे. गु.र.नं. १५९/२०२२ भादंवि क. ३७९, ३४ प्रमाणे दाखल असुन त्यात १,११,८४९/- रुपये रोख व ४,०००/- रुपयाचे ०२ मोबाईल असा एकूण १,१५,८४९/- रुपये चोरी गेलेले आहे. हा गुन्हा आरोपी आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव व त्याचा एक साथीदार (१) मनिष सुभाष चव्हाण रा. लोणवाडी ता. जळगाव अशांनी केल्याचे आरोपी आकाश दिलीप पवार यांने कबुल केले आहे.,

२) एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. २१५/२०२२ भादंवि क.३९४,३४ आर्म अॅ.क.३/२५ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयांत ९५,८७३/- रुपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा टॅब असा एकूण १,१४,६२९/- रुपयाचा माल चोरी गेलेला आहे. हा गुन्हा आरोपी सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, त्याचे साथीदार आकाश दिलीप पवार, सागर कंजर (विशाल बागडे चा भाचा) रा. कंजरवाडा, जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे.,

३) एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. ३५२/ २०२२ भादंवि क. ३९४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत १,०७,१५८/- रुपये रोख व ०१ मोबाईल असा एकूण १,२२,१५८/- रुपयाचा माल चोरी गेलेला आहे. हा गुन्हा आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव व सागर कंजर (विशाल बागडे चा भाचा) रा. कंजरवाडा, जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे.,

४) पाचोरा पो.स्टे. गु.र.नं. १४९ / २०२२ भादंवि क. ३९२.३४ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयांत १,८१,६२० /- रुपये रोख चोरी गेलेला आहे. हा गुन्हा आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव यांनी त्यांचे साथीदार विशाल विजयसिंग बागडे रा. कंजरवाडा, जळगाव, व दिपक
शर्मा रा. कुसूंबा ता. जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे. त्यात आरोपी विशाल विजयसिंग बागडे वय ३० रा.कंजरवाडा, जळगाव यास सुध्दा ताब्यात घेण्यात आले असून त्यास पाचोरा पो.स्टे. गु.र.नं. १४९/२०२२ भादंवि क. ३९२, ३४ या गुन्हयांत पुढील तपास कामी हजर करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर पो.स्टे. गु.र.नं. ३९१/२०२२ भादंवि क. ३९४ या गुन्हयांत गुन्हयात ९,००,०००/- रुपयाचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८०,०००/- रुपयाचे ०२ किलो चांदीवे दागिने, ८०,०००/- रुपये रोख असा एकूण १०,६०,०००/- रुपयाचा माल चोरी गेलेला आहे. सदर गुन्हयांत १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु.मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, २) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा.भिकनगाव जि. खरगौन (म.प्र.), ह.मु.रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, ३) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव यांना जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीतून ताब्यात घेण्यात आले असून ४) विशाल देविदास मराठे वय २३ रा. रायपुर कंडारी ता. जळगाव यास रायपुर कंडारी ता. जळगाव येथून व ५) विनोद विश्वनाथ इंगळे वय ३४ रा. उचंदा ता.मुक्ताईनगर यांस मुक्ताईनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी. १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव याने सदर गुन्हयांत चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने त्याचे घरात लपवून ठेवल्याचे कबुल केल्याने त्याचे घरातुन ३१० ग्रॅम सोन्याचे दागिने कि.रु. ९,००,०००/- रुपये, व ४ किलो ७२६ ग्रॅम चांदीचे दागिने कि.रु. ३,००,८०० /- रुपयेचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करुन गुन्हयांत वापरलेली त्याची मोटार सायकल बजाज पल्सर एमएच १९ / ईवी- १९४५ ही ५०,०००/- रुपया किमंतीची त्याचे कडून जप्त करण्यात आली आहे. आरोपी प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा. भिकनगाव जि. खरगौन (म.प्र.), ह.मु. रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव याची ३०,०००/- रुपये किमंतीची ०१ होंडा शाईन मोटार सायकल क्र. एमएच १९/बीवाय ६३०५ ही त्याचे कडून जप्त करण्यात आलेली आहे.. सोन्या-चांदीचे दागिने व २ मोटार सायकल असा एकूण १२,८०,८००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील ५ ही आरोपीतांना मुक्ताईनगर पो.स्टे. च्या वरील गुन्हयांत अटक करण्यात आलेली आहे.

अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणून चांगली कामगिरी केलेले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!