क्राईमताज्या घडामोडी

येवला शहरात जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांना येवला शहर पोलीसांनी ठोकल्या बेडया.

येवला शहर पोलीसांची उलेखन्निय कामगीरी:-

पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस ठाणे यांचे हद्दीतील चोरींचे तपासास मिळाली गती

येवला, ता. येवला, जि. नाशिक ग्रा. फोन नंबर ०२५५९-२६५०१६.

येवला शहरात जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांना येवला शहर पोलीसांनी ठोकल्या बेडया.

दि. २८/०७/२०२३ रोजी रात्री ०८/०० वा चे दरम्यान तहसिल कार्यालयाजवळील येवला कोपरगांव रोडलगत फिर्यादी अजय राजेंद्र वाळके रा कोल्हेवाडी, ता संगमनेर, जि. अहमदगनर, हे पायी जात असतांना दोन अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील विवो वाय २० कंपनीचा मोबाईल १००००/- रू किंमतीचा व रोख रक्कम ५००/-रू हे जबरीने चोरी करून पळून गेले होते. वगैरे मजकूरच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलीस ठाणे गुरनं. २५०/२०२३ भादविक. ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दि. २८/०७/२०२३ रोजी दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात गोपनीय बातमीदाराच्या मार्फत अज्ञात आरोपीतांचा शोध घेउन त्यांना ताब्यात घेउन त्यांच्या अंगझडतीत गुन्हयातील गेला माल विवो बाय २० कंपनीचा मोबाईल १००००/- रू किंमतीचा व रोख रक्कम ५००/-रू हे मिळून आले असून सदर आरोपी नामे १) लक्ष्मण आण्णा गायकवाड वय २५, २) रविंद्र बालू माळी वय २२ दोन्ही रा. मायगांव देवी (सांगवी भुसार) ता कोपरगांव जि. अहमदनगर यांना सदर गुन्हयात दि. २९/०७/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीतांना मा. न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना दिनांक ३१/०७/२०२३ पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमाप सो, मा. अपर पोलीस अधिक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड श्री सोहेल शेख सो यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, यांचे सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्री सुरज मेढे, पोशि/ २६४२ गणेश पवार, पोशि/४४५ बाबा पवार, पोशि/ ९८५ सतिश बागुल, पोशि/ १९३३ तौसीफ शेख यांनी केला आहे.
सदर कारवायी मुळे येवला पोलीसांचे कामगीरीचे कौतुक सवञ होत आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!