कृषी व व्यापार

येवले तालुक्यातील विखर्णी येथील प्रगत शेतकरी श्री. विठ्ठलराव शेलार हे परंपरेचे म्हणजे मका, कांदा, गहू इत्यादी पिकतर घेतातच त्याच बरोबर आगळे प्रयोग करून पिके घेण्याकडे देखील त्यांचा कल दिसून येतो

प्रतिनिधी:—सचिन वखारे
येवले तालुक्यातील विखर्णी येथील प्रगत शेतकरी श्री. विठ्ठलराव शेलार हे परंपरेचे म्हणजे मका, कांदा, गहू इत्यादी पिकतर घेतातच त्याच बरोबर आगळे प्रयोग करून पिके घेण्याकडे देखील त्यांचा कल दिसून येतो. आता त्यांनी आपल्या शेतात प्रथमच वांग्याचे पिक घेतले आहेत. भडीताचे वांगे एका वांग्याचे वजन सरासरी पाचशे ते सहाशे ग्रॅंम इतके भरते. इतकी मोठी वांगी प्रथमच पाहिल्यावर त्या बद्दलची आधीक माहिती घेण्या करीता मी श्री. विठ्ठलराव शेलार यांचे शेतावर गेलो. ते व त्यांचे एक चिरंजीव अधिक
ती अशी..
श्री. अरुणराव शेलार यांचे कडून जी माहिती मिळाली.

ही वांग्याची रोप सटाणा येथील एस. राज, नर्सरी येथून आणली आहेत. साधारण तीन ते सहा फुटावर रोपांची लागण केली. आहे. एका एकरात २५०० रोपांची लागवड केली आहे. लागण केल्या नंतर अडीच ते तीन महिण्यात रोपांना वांगी येवू लागतात एका रोपाला साधारण 7ते8 वांगी लागतात. या वांग्यांचे आजूबाजूला बरीच पान येवून त्यांचा वांग्यावर सावली सारखा उपयोग होतो. त्यामुळे उन्हा पासून वांग्याचा बचाव होतो. अशी ही निसर्गाची योजना दिसते. पहिला तोडा निघाला एका एकरात 200&250 कॅरेटचे उत्पन्न निघाले. आता दुसऱ्या तोड्यातून तीनशे कॅरेटचे उत्पन्न होईल अशी त्यांना आशा आहे. चार ते पाच महिने हे असेच उत्पन्न चालू राहिल. एका गरीष्ट विशीष्ट आळीचा रोपावर परिणाम होतो. या वांग्याचे उत्पन्न बरेचसे निसर्गावर अवलंबून असते. ही सर्व वांगी नाशिक व मुंबई मार्केटला विक्रीसाठी नेली जातात. निसर्गाची साथ मिळत राहिलास सर्व खर्च 60,000 ते 70,000 वजा जाता तीन ते चार लाख रुपयां
पर्यंत फायदा होवू शकेल अशी शा व्यक्त केली. त्यांनी. याच प्रमाणे अॅपल बोर, जांभूळ, पेरू, मोसंबी यांचे देखील आगळे-वेगळे उत्पन्न या पूर्वी त्यांनी घेतले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!