ताज्या घडामोडी

सोनुर्ले-धोंडेवाडी येथे शिकार करणार-या चौघांना पोलीस कस्टडी*

*सोनुर्ले-धोंडेवाडी येथे शिकार करणार-या चौघांना पोलीस कस्टडी*

वन विभागाच्या कारभाराबाबत परिसरात उलट सुलट चर्चा….

संशयीतांना ताब्यात घेतल्यापासून वन विभागाची पूर्णता गुप्तता….

पत्रकारांच्या पासून पूर्ण आरोपींची गुप्तता ठेवण्यात आली…

पन्हाळा-प्रतिनिधी: किरण मस्‍कर

धोंडेवाडी येथील जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या पन्हाळा तालुक्यातील चार जणांना वनविभागाच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले असून आज कळे न्यायालयामध्ये हजर केले असता संशयीतांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे…

शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथे जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या पन्हाळा तालुक्यातील खडेराव रंगराव मेडसिंग रा. कसबा ठाणे, मारूती पांडूरंग माटल रा. सोनुले पैकी धोंडेवाडी, पांडूरंग मारुती पाणबुडे-रा. खोतवाडी व कोतोली पैकी मानेवाडी येथील प्रदीप धनाजी साळोखे अशा चौघा जणांना वनकर्मचा-यांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. पण वनविभागाच्या वन अधिकारी सुषमा जाधव यांनी याबाबत पूर्ण:ता गुप्तता पाळली होती, रात्री उशिरा पर्यंत कोण आरोपी व किती आहेत याबाबत कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. अचानक चार वाजण्याच्या सुमारास संबंधित आरोपींना कळे न्यायालयान हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली खरी पण आरोपीच्या बाबतीत वनविभागाने ऐवढी गुप्तता का पाळली याची उलट-सुलट चर्चा मात्र न्यायालयाच्या दारात सुरु होती…

चौकट-

शिकार करताना गुरुवारी रात्री संशयित आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले. पण तेव्हापासून कोर्टात घेऊन जाईपर्यंत आरोपी कोण आहेत..? किती आहेत …?याबाबत मात्र वन विभागाने पूर्ण गुप्तता पाळली होती. यामुळे न्यायालयाच्या दारात वन विभागाच्या कारभाराबाबत उलट सुलट चर्चा होती…

चौकट–

*मोठ्या पैलवानांचे नाव कट….*

शिकार करण्यासाठी एकूण पाच जण गेले असल्याचे माहिती नागरिकांच्यातून पुढे येत होती पण वन विभागाने चार जणांच्या वरच गुन्हा दाखल केला आहे यामधील एक कुस्तीचा मोठा पैलवान असल्याची बोलले जात आहे…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!