ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यात कृषि भवन साकारणार*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यात कृषि भवन साकारणार*

*येवला तालुका कृषि अधिकारी, तीन मंडल कृषि अधिकारी कार्यालय व फळरोपवाटिकेसह कृषिभवन बांधकामास १३ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर*

*नाशिक,दि.१६ मार्च :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुका कृषि अधिकारी, तीन मंडल कृषि अधिकारी कार्यालय व फळरोपवाटिकेसह कृषि भवन बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी १३ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा तसेच शेतीसंबंधी सर्व प्रशासकीय कामकाज करण्यासाठी एकाच छताखाली सर्व कृषि भवन कार्यालय असावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार येवला कृषि अधिकारी कार्यालय व तीन मंडल अधिकारी कार्यालय व रोपवाटिकेसह कृषि भवन बांधकामास प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन त्यासाठी १३ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कृषि भवना मध्ये कृषि भवन इमारत, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना फळप्रक्रिया व इतर प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण हॉल बांधण्यात येणार आहे. तसेच गॅस पाईप लाईन, बायो डिझास्टर यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर लाईट, स्ट्रीट लाईट, फर्निचर, संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक, सीसीटीव्ही, शौचालय, पार्किंग, अंतर्गत रस्ते, पाण्याची टाकी, पंप यासह विविध कामांचा समावेश आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!