ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस.शैक्षणिक संकुलात गुणवंतांचा सत्कार व श्री फॅमिली गाईड ट्रेनिंग संपन्न.*

*एम.एस.जी.एस.शैक्षणिक संकुलात गुणवंतांचा सत्कार व श्री फॅमिली गाईड ट्रेनिंग संपन्न.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात “सुकन्या २०२४” पुरस्कार प्राप्त यांचा सत्कार व श्री फॅमिली गाईड ट्रेनिंग कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.अरुण भांडगे हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंदरसुल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. विनिता अमोल सोनवणे, तनिष्काच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा मकरंद सोनवणे, ब्रह्मकुमारीच्या दामिनी दिदी, सकाळ समूहाचे निखिल रोकडे, सुधीर कुलकर्णी, सागर वाघ हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यानंतर शिक्षिका सुष्मिता देशमुख यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यानंतर संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे यांच्या हस्ते “सुकन्या २०२४” पुरस्कार प्राप्त सौ.विनिता अमोल सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर दामिनी दिदी यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे यांनी केला, तर तनिष्काच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा मकरंद सोनवणे यांचा सत्कार संस्थेचे संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी केला, यानंतर निखिल रोकडे, सुधीर कुलकर्णी व सागर वाघ यांचा सत्कार संस्थेचे संचालक जीवन गाडे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर सकाळ समुह आयोजित श्री फॅमिली गाईड ट्रेनिंगची माहिती निखिल रोकडे व सुधीर कुलकर्णी यांनी दिली. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.विनिता अमोल सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की विज्ञानाबरोबर आध्यात्मिकता असेल तर मानसिक शांतता लाभते. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भांडगे यांनी “सुकन्या २०२४” पुरस्कार प्राप्त सौ. विनिता अमोल सोनवणे व दामिनी दिदी यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यू.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमिच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सिद्धी दोडे, साक्षी देशमुख, गणेश सोनवणे, मयूर भागवत, संदीप बोढरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास तनिष्काच्या सदस्या सौ. वर्षा आकाश सोनवणे, सौ. हर्षदा किशोर सोनवणे, सुनील सपकाळ, सचिन बोढरे, गोकुळ वणी, मयुरी टेके, निर्मला शिकारे, वैशाली शिंदे सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका माधुरी माळी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!