ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…* *अनकाई व नगरसुल स्टेशनच्या दरम्यान रस्ता व पादचारी भुयारी मार्गास रेल्वेची मंजूरी*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…*

*अनकाई व नगरसुल स्टेशनच्या दरम्यान रस्ता व पादचारी भुयारी मार्गास रेल्वेची मंजूरी*

*नाशिक,येवला,दि.१२ मार्च :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून अनकाई व नगरसुल रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धामोडे – कुसमाडी – कुसूर रस्त्यावर रस्ता आणि पादचारी वाहतुकीसाठी पादचारी भुयारी मार्गास रेल्वेकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

मनमाड – मुदखेड विभागावरील अनकाई आणि नगरसुल स्थानकांदरम्यान स्थानकाच्या दरम्यान धामोडे -कुसमाडी- कुसूर रस्त्यावर किमी.१९/२-३ येथे जलमार्ग पूल आहे. हा जलवाहतूक करणारा जलमार्ग पूल असूनही या पुलाचा अनधिकृतपणे स्थानिक नागरिक रूळ ओलांडण्यासाठी करत होते. पुलाच्या तसेच प्रवासी जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे हितावह नव्हता. यासाठी येवला तालुक्यातील अनकाई व नगरसुल दरम्यान स्थानकाच्या दरम्यान धामोडे -कुसमाडी- कुसूर रस्त्यावर परिसरात रस्ता व भुयारी पादचारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी होती. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांनी महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांना पत्र देऊन रस्ता व पादचारी भुयारी मार्ग मंजूर करण्याची मागणी केली होती. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्फत रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरु होता.

त्यानुसार महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांचे दि. २६.०२.२०२४ पत्र अन्वये अनकाई व नगरसुल स्थानका दरम्यान धामोडे – कुसमाडी – कुसूर रस्त्यावर लिमिटेड हाईट सबवे प्रकारचा रस्ता व भुयारी पादचारी मार्ग तयार करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना येवला शहराशी दळणवळण करण्यासाठी अधिक फायदा होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!