ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना ६३ कोटींची दुष्काळी मदत* *येवला तालुक्यात ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दुष्काळ मदत वर्ग

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना ६३ कोटींची दुष्काळी मदत*

*येवला तालुक्यात ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दुष्काळ मदत वर्ग*

*नाशिक,येवला,दि.१३ मार्च :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना ६३ कोटीची रुपये मदत प्राप्त झाली आहे. येवला तालुक्यातील सुमारे ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणार आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. या शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार येवला तालुक्यासाठी शेतकऱ्यांना ६३ कोटी रुपयांची मदत महसूल विभागाला प्राप्त झाली आहे. या माध्यमातून येवला तालुक्यातील सुमारे ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तलाठी कार्यालयात करावी. त्यातून शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!