ताज्या घडामोडी

महिलांनी लघु उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*महिलांनी लघु उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

रिपब्लिकन पक्षाचा महिला मेळावा उत्साहात
भारती धिंगान(प्रतिनिधी)
नाशिक दि.12 – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले व त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले तसेच महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री ना.मंगल प्रभात लोढा; माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .अध्यक्षस्थानी रिपाइं महिला आघाडी च्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामळू आणि सूत्रसंचालन रिपाइं महिला आघाडी च्या राज्य सरचिटणीस ऍड.अभया ताई सोनवणे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले रामदास आठवले यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे म्हणून मी त्यांना मानतो. गोरगरिबांसाठी कणव आणि कणा असलेला नेता म्हणून मी त्यांना मानतो. परदेशात मोदींसोबत रामदास आठवले गेले असता मोदींना जेवढी प्रसिद्धी तिथल्या वृत्तपत्रांनी दिली तितकीच प्रसिद्धी रामदास आठवलेंनाही दिली याबाबत ची लंडन प्रवासातील आठवण ना.लोढा यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले
महिलांच्या हक्कासाठी संसदेत मी जाणार
तुमचे हक्क घेऊन पुन्हा परत येणार.असे म्हणत ते पुढं म्हणाले महिलांनी गृह उद्योग सुरू केले पाहिजेत; लघु उद्योगात महिलांनी पुढे आले पाहिजे. कुटुंब चांगलं राहण्यासाठी आता महिलांनी सुद्धा छोटे मोठे लघु उद्योग उभारून स्वयंरोजगार करणे आवश्यक आहे असं मत ना.रामदास आठवले यांनी मांडले.आपल्या महिलांनी बचत गट सुरू केले पाहिजेत असा सल्ला ना.आठवलेंनी दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रिपाइं महिला आघाडी च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा चंद्रकांताताई सोनकांबळे; ऍड.आशाताई लांडगे; फुलाबाई सोनवणे; शिलाताई गांगुर्डे; शशिकला जाधव; वंदना उर्फ बेला मेहता; नैनाताई संजय वैराट; स्वप्नाली जाधव; गीत ठक्कर आदी अनेक महिला प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!