ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…* *येवला मतदारसंघातील अंगणगांव चिचोंडी ते वाकद रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नती*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…*

*येवला मतदारसंघातील अंगणगांव चिचोंडी ते वाकद रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नती*

*नाशिक,येवला,दि.१ मार्च :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील अंगणगांव ते चिचोंडी खु. चिचोंडी बु. साताळी भिंगारे मुखेड सत्यगांव ते वाकद राज्य महामार्ग ७ तालुका हद्द या रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाकडून मंजूर मिळाली आहे.

येवला मतदारसंघातील अंगणगांव ते चिचोंडी खु. चिचोंडी बु. साताळी भिंगारे मुखेड सत्यगांव ते वाकद राज्य महामार्ग ७ तालुका हद्द या इतर जिल्हा मार्ग १९२ ची दर्जोन्नती होऊन यास प्रमुख जिल्हा मार्ग २०७ हा क्रमांक प्राप्त झाला आहे. या १६.५०० किलोमीटर रस्त्याची दर्जोन्नती झाल्याने या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी प्राप्त होऊन दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!