ताज्या घडामोडी

ईव्हीएम हटाओ देश बचाओ …सर्व संघटनांचा क्रांतीकारी मोर्चा….

*ः
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:येवु घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुका त ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, गली गली मे शोर है ईव्हीएम मशीन चोर है ।नाशिक शहरातील आज गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय सीबीएस नाशिक येथे विविध संघटना व पक्ष यांचे वतीने सविधान सन्मान साठी मोठ्या संख्येने ईव्हीएम मशीन विरोधात महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात वकिलांचा, महिलांचा, विविध सामाजिक संघटनांचा, राजकीय पक्षांचा, महिला संघटनांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात होता. या मोर्चामध्ये महिलांनी ईव्हीएम ची अंतयात्रा काढण्यात आली व ईव्हीएम विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोर्चा इतका जबरदस्त होता की प्रशासन सुद्धा हादरले.
सदर मोर्चात भारत मुक्ती मोर्चा, संविधान सन्मान वकील समिती नाशिक, माता रमाई महिला मंडळ, , भीम आर्मी नाशिक जिल्हा, मेत्ता मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन, आझाद पार्टी, मानवतावादी बहूउद्देशीय संस्था, संविधान प्रेमी नाशिककर, आंबेडकराईट पँन्थर्स आँफ इंडिया,महाराष्ट्र जनरल कामगार संघटना, सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संघटना, नाशिक जिल्हा बेरोजगार अपंग स्वयंसेवी संघटना, शेतकरी संघटना सलग्न धनवान पार्टी ऑफ इंडिया,बी आर एस पी ,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, संत गुरू रविदास महाराज विचारमंच, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, बहुजन मुक्ती पार्टी, माता रमाई महिला मंडळ सिडको उपासक उपासिका उपस्थित होते.नाशिक, बहुजन क्रांती मोर्चा, नाशिक, भारतीय विद्यार्थी मोर्चा नाशिक, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ नाशिक, इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन नाशिक , भारतीय बेरोजगार मोर्चा आय एल पी ए,बहुजन हितकारणी सभा नाशिक आदी संघटनांचा सहभाग होता.
आंबेडकराईट पॅंथर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटक कैलासभाई पगारे,महीला आघाडीच्या नेत्या जयश्रीताई वाघ, नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष:- राहुल जाधव, युवानेते:- आकाशजी भालेराव, निफाडचे प्रल्हाद आहीरे, देवळा तालुक्यातील नेते , आहीरे, युवानेते आर्यन पगारे, उतर महाराष्ट्र प्रवक्ता शांताराम दुनबळे आदी असंख्य महिला पुरूष पदाधिकारी कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले होते!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!