ताज्या घडामोडी

लेखी पास फक्त ग्राऊंड राहिलेलं, पण नियतीच्या मनात पिळवटून टाकणारी घटना!

लेखी पास फक्त ग्राऊंड राहिलेलं, पण नियतीच्या मनात पिळवटून टाकणारी घटना!

अहमदनगर प्रतिनिधी : राम सांगळे

प्रयत्नाअंती परमेश्वर अशी म्हण आहे पण याला विवाहित महिला मनीषा कडणे अपवाद ठरली आहे. जीवतोड मेहनत केली, अर्धी लढाई जिंकली होती. मात्र त्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला, नेमकं काय घडलं?
संगमनेर : सरकारी नोकरीसाठी सगळेच प्रयत्न करतात. यामध्ये काहींना यश येतं मात्र काहींचं ते स्वप्नच राहून जातं. असंच विवाहित मनीषा दीपक कडणे या महिलेने भरती होण्याचं स्वप्न पाहिलेलं.  तिने अर्धी लढाई जिंकली होती पण नियतीने तिचा घात केला. वनरक्षक पदासाठी भरतीची तयारी करत असलेल्या मनीषा कडणेने लेखी परीक्षा पास केली होती. आता राहिलं होतं ते ग्राऊंड, मात्र त्याआधी काळाने तिच्यावर झडप घातली. मनीषासोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
नियतीने केला मनीषाचा घात
अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर शहरातील विवाहित महिला मनीषा कडणे भरतीसाठी प्रयत्न करत होती. संसाराचा गाडा हाकत तिने आपल्या स्वप्नाचा पाठलाग सुरू ठेवला होता. मनीषाने वनरक्षक पदाची लेखी परीक्षा पास केली होती. आता फक्त शारीरिक चाचणीची परीक्षा राहिली होती, रोजच्याप्रमाणे मनीषा सरावासाठी मैदानात गेली होती. नेहमीप्रमाणे तिने मैदानाता दोन राऊंड मारले त्यानंतर  काही वेळातच तिला त्रास जाणवू लागला.
मनीषाला चक्कर आली अन्…
मनीषाने ग्राऊंडला फेऱ्या मारल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला. त्यानंतर तिथेच खाली बसली अन् काही वेळात ती खाली कोसळली. जवळपास असलेल्या लोकांनी तिला पाहिल्यावर तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. कोणालाच काही समजलं नाही नेमकं काय झालं? रूग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासल्यावर तिला मृत घोषित केलं. गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर ही घटना घडली. मनीषाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!