ताज्या घडामोडी

माझी लढाई अजित पवार गटाविरोधात नाही! सु्प्रिया सुळे

मुंबई प्रतिनिधी :- ‘नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे’ हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी कधीही अजित पवारांवर टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आहे का हा नेहमीच प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडत असतो. आता आज सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. माझी लढाई अजित पवार गटांसोबत नाही, असे सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चंना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला. या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाई फक्त भाजपाविरोधात आहे. शिंदे गट किंवा अजित पवार गटांसोबत नाही. सुनेत्रा पवार यांचे लागलेले बॅनर मी नाही पाहिले नाही.
ललित पाटील प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ड्रग्जच्या बाबतीत कोणही राजकराण करू नये. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ड्रग्जचे भंडाफोड देशासमोर केली पाहिजे. ड्रग्ज विरोधात सरकारने कडक कारावाई केली पाहिजे .गृहमंत्री कडक कारवाई करणार असतील तर आम्ही स्वागत करु. या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!