क्राईम
रावेर शहरात दुकानाचे शटर फोडून; २५ हजारांचा मुद्देमाल लंपास
रावेर शहरात दुकानाचे शटर फोडून; २५ हजारांचा मुद्देमाल लंपास
प्रतिनिधी शाहिद खान
रावेर: शहरात दुकानाचे शटर उघडून तब्बल २५ हजारांचे मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शेख आरिफ शेख रऊफ यांच्या प्लॉट खरेदी विक्रीच्या रावेर शहरातील सावदा रोड येथे यांचे कार्यालय आहे.
अधिक माहिती अशी, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे कार्यालाचे शटर उघडून सुमारे २३ हजारांची बॅटरी व दोन हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटर लांबवली. याबाबत शेख आरिफ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करीत आहे.