क्राईम

पाचोरा तालुक्यात ४६ लाखांचे गांजाचे झाडे जप्त

पाचोरा तालुक्यात ४६ लाखांचे गांजाचे झाडे जप्त

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव: पाचोरा तालुक्यातील सावखेडा शेतशिवारातील गांजाची शेतीवर पोलिसांनी कारवाईच्या बुलडोझर सुरुवात ४६ लाख रुपयांचे गांजाची (दोन शो) झाडे जप्त केली. तर एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. सुभाष बाबुराव पाटील, ( वय-५९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, सावखेडा ता. पाचोरा शिवारातील शेतात त्याने गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी बुधवारी रात्री तिथे लागलीच छापा टाकला. त्यावेळी शेतात गांजाची ( दोन,शो) झाडे आढळून आली असून त्याची ४६ लाख रुपये इतकी किंमत आहे. याबाबत सुभाष पाटील यांच्या विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भारत काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली‌. दरम्यान एरंडोल तालुक्यातील याच महिन्याच्या सुरुवातीला खडकीसिम शेतशिवरातील गांजाची शेती स्थानिक पोलिसांना उधळून लावली होती. यावेळी पोलिसांनी तब्बल ६१ लाख २५ हजार रुपये किमतीच्या गांजा जप्त करत दोन जणांवर गुन्हा दाखल केला होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!