ताज्या घडामोडी

जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत 14, 17 व 19 वर्षाखालील आंतर शालेय मुलांच्या कॅरम स्पर्धा संपन्न*

*जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत 14, 17 व 19 वर्षाखालील आंतर शालेय मुलांच्या कॅरम स्पर्धा संपन्न*

प्रतिनिधी शाहिद खान

जैन स्पोर्ट्स अकॅडमी तसेच जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14, 17 व 19 वर्षाखालील आंतरशालेय मुलांच्या स्पर्धा आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कांताई सभागृह येथे संपन्न झाले.
सदर स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात खान मोहम्मद हमजा ( सेंट लॉरेन्स)हा विजयी ठरला तसेच हर्षल तायडे (अनुभूती इंग्लिश स्कूल) उपविजेता, यश धोंगडे (आर आर विद्यालय) तृतीय क्रमांक, मुजम्मिल मन्यार (मिल्लत हायस्कूल) चतुर्थ क्रमांक, त्याचप्रमाणे पाच ते आठ क्रमांकासाठी शेख सुफियान(मिलत हायस्कूल), अर्शद शेख (अँगल उर्दू हायस्कूल),उसामा फहीम( मिल्लत उर्दू हायस्कूल) व कृष्णा महाले(अनुभूती इंग्लिश स्कूल) यांनी प्राप्त केले.
17 वर्षाखालील क्रमांक एक ते आठ पुढील प्रमाणे,
मयंक मंडोरे(सेंट लॉरेन्स) ,शेख मोहम्मद उमर, खान उमर अजिज (दोघे मिल्लत स्कूल), अली मलिक (सेंट लॉरेन्स) नूरुलएन अबूबकर, शिकलगार आयान (मिल्लत स्कूल), रेहान शेख व सादिक खान अँग्लो उर्दू हायस्कूल यांनी पटकावले.
19 वर्षाखालील गटात क्रमांक एक ते आठ पुढील प्रमाणे आहे
देवेंद्र शिर्के(एम जे कॉलेज), शेख नाईश अहमद (अँग्लो उर्दू हायस्कूल), सुमित भोये (एम जे कॉलेज), शेख मोहम्मद शाहिद, पिंजारी उमेर, अजीम शेख (अँग्लो उर्दू हायस्कूल) , शेख शाहिद ( मिल्लत उर्दू हायस्कूल) व ओम बोढरे (एम जे कॉलेज).
स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व श्री सय्यद मोहसिन मोहम्मद फजल योगेश धोंगडे आईशा खान सुमित भोई देवेंद्र शिर्के मुख्तार सर इत्यादींनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन. सय्यद मोहसीन, शहबाज शेख, मीनल थोरात, फारुख शेख ,वसीम मिर्झा, मोहंमद फजल कासार व रवींद्र धर्माधिकारी दिसत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!