ताज्या घडामोडी

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये एजंट गिरी फोफावली

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये एजंट गिरी फोफावली
हातकणंगले प्रतिनिधी. संतोष कोठावळे
सांगली इचलकरंजी व कोल्हापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सध्या एजंटांचा सुळसुळाट जोरात चालू आहे बांधकाम कामगार नोंदणी मध्ये या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एजंट बोगस कामगार नोंदणी करून नियमबाह्यरित्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या लाभ उचलत असून शासनाचा कोट्यावधींचा निधीवर उघडपणे डल्ला मारला जात आहे अधिक माहिती अशी इचलकरंजी सांगली व कोल्हापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून‌ एजंटांनी बांधकाम कामगार नोंदणी मध्ये नियमबाह्यरित्या नोंदण्या करणे स्वतःचे अर्ज झटपट मंजूर करून घेणे व लगेचच शिष्यवृत्ती व इतर लाभाचे अनुदान मंजूर करून घेणे इत्यादी प्रकार या कार्यालयामध्ये घडत आहेत याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे काय असा सवाल उपस्थित होत आहे. दोन महिन्यांपूर्वी नोंदणी केलेला अर्ज व त्याचा शिष्यवृत्तीचा लाभ दोन महिन्यातच कसा मंजूर होतो एकीकडे गेली सहा सात महिने अर्ज प्रलंबित असताना आत्ता आलेले अर्ज मंजूर होऊन लगेच शिष्यवृत्ती व इतर लाभाचे अर्ज कसे काय मंजूर केले जातात याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे काही संघटना याविरुद्ध आवाज उठवतात परंतु त्यांना नाहक त्रास या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून दिला जातो असेच एक प्रकरण व त्याचा सबळ पुरावा उपलब्ध आहे याला जबाबदार कोण याप्रकरणी माननीय कामगार मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची सखोल अशी चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!