क्राईम

बोदवडला गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यांवर धाड; ११ हजारांचे रसायन नष्ट

बोदवडला गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यांवर धाड; ११ हजारांचे रसायन नष्ट

प्रतिनिधी शाहिद खान

बोदवड-: शहरातील राधेश्याम वर्मा यांच्या शेताजवळील नाल्यात गावठी दारूच्या अड्डा सुरू असल्याची माहिती बोदवड पोलिसांनी मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास पोलिसांना कारवाई करीत. दोन ड्रम मधील कच्चे व गरम ४०० लिटर रसायन तसेच हातभट्टीवरील ६९ लिटर तयार मिळुन १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
संतोष लालजी मोरे ( वय- ५२) रा. भिलवाडी, बोदवड, असे संशयितचे नाव आहे. हा पोलिसांना पाहताच पसार झाला. या प्रकरणी मोरे विरोधात बोतवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, वसंत निकम हवालदार, संतोष चौधरी, तुषार इंगळे, दीपक पाटील, मुकेश पाटील, आदिंच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास युनुस नाईक तडवी करीत हे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!