ताज्या घडामोडी

सुप्रीम कॉलनीत पैसे मागण्याच्या कारणवरून एकाला बेदम मारहाण

सुप्रीम कॉलनीत पैसे मागण्याच्या कारणवरून एकाला बेदम मारहाण

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात सुप्रीम कॉलनी एका ५८ वर्षीय मजुराला पैसे मागण्याच्या कारणावरून शिवगीळ करुन लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापकत केली आहे.
मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, गोपाल राजाराम सपकाळे (वय-५८) रा. सुप्रीम कॉलनी श्रीकृष्ण नगर जळगाव, हे मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २२ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) हा त्यांच्या जवळ येऊन त्यांच्याकडे पैसे मागू लागला. यावेळी गोपाल सपकाळे यांना पैसे देण्यास नकार दिला. याच्या राग आल्याने सोन्याने त्याच्या हातातील लाकडी दणक्याने सपकाळे यांना बेदम मारहाण करून गंभीर धोकापात केली.
या मारहाणीत त्यांच्या छातीला व हाताला गंभीर जखमी झाल्याने त्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता गोपाल सपकाळे, यांनी दिलेले फिर्यादी वरून संशयित आरोपी सोन्या याचे विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!