ताज्या घडामोडी

शिवकॉलनीत अज्ञात चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबविली

शिवकॉलनीत अज्ञात चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबविली

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातून एकाची १२ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेल्याची घटना समोर आली. या बाबत मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कुमार दिवाकर सिरोदे (वय- ५३) रा. शिवकॉलनी जळगाव हे आपल्या परिवारास वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात.
१९ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता त्यांच्या घरासमोर त्यांची दुचाकी (एमएच १९ एटी ९०८०) ही पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांना ही १२ हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरून नेली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला. दुचाकी कुठेही मिळुन न आल्याने अखेर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!