आरोग्य व शिक्षण

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सकाळ प्रश्न मंजुषा “सुपर फॅमिली” चे बक्षीस वितरण.

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सकाळ प्रश्न मंजुषा “सुपर फॅमिली” चे बक्षीस वितरण.*
*अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सकाळ वर्तमान पत्र आयोजित प्रश्न मंजुषा “सुपर फॅमिली” चे बक्षीस वितरण संपन्न झाले.या स्पर्धेत एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे स्वरूप रोज एक कुपन वर्तमान पत्रात येईल त्याचे उत्तर व्यवस्थित लिहून चिटकवायचे होते.ही स्पर्धा १०० दिवस चालली.त्यात अचूक उत्तर लिहून ९० कुपन चितकवायचे होते. या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन अंदरसुल ग्राम पालिकेच्या मा. सरपंच सौ.विनिताताई अमोल सोनवणे या होत्या. इ.नर्सरी ते १० वी पर्यंतच्या सहभागी विद्यार्थ्यांना स्कुल बॅग गिफ्ट देण्यात आली. यावेळी स्पर्धा यशस्वी पार पाडल्याबद्दल इंचार्ज शिक्षक अजहर खतीब यांचा सत्कार करण्यात आला.*
*याप्रसंगी प्रिंसिपल अल्ताफ खान, अमोल आहेर, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, गणेश सोनवणे, अमजद अंसारी, अजीम पटेल, गौरव सैंदाने, मनिष सैंदाने, माधुरी माळी, सुनीता वडे, शर्मिला पवार, चेतना माकूने, अर्चना एंडाईत, सुश्मिता देशमुख, आलिया खान आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!