क्राईम

गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यांवर एमआयडीसी पोलिसांच्या छापा

गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यांवर एमआयडीसी पोलिसांच्या छापा

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात अवैध गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यांवर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सकाळी ८:०० वाजता शहरातील सिंधी कॉलनी जवळील कंजरवाडा परिसरात कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख ६१ हजार २२० रुपये ची मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधीकॉलनी नजीकच्या कंजरवाडा, तांबापुरा, भिलाटी, यासह जाखनी नगरातील गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यासह दारू भट्टी चालकांवर व एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पथकाकडून चार हजार लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, १५० लिटर गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली.
तसेच ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, यांच्या मार्गदर्शनखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना गणेश शिरसाळे, सचिन पाटील, महिला पोलीस कर्मचारी सैय्यद निलोफर, हेमंत कळस्कर, आदींनी या कारवाईत के
या प्रकरणी १ वैशाली राजेश अभंगे, रा. महादेव मंदिर, २ चंदनाबाई विष्णू अभंगे, रा. तांबापुरा खदान, ३ जितेंद्र सुरेश जाधव रा. आठवडे बाजार पोलीस चौकी, ४ संगीता चंदन बाटुंगे रा. सिंगापूर कंजर वाडा, ५ माधुरी गोविंदा बाटुंगे रा. सिंगापूर कंजरवाडा, ६ वर्षा गोकुळ बांगडे रा. सिंगापूर कंजरवाडा, ७ हिना प्रशांत गुमाने रा. सिंगापूर, नैनिता मंगलकुमार गुमाने रा. जोशी कॉलनी, ८ बादल देविदास बाटुंगे रा. नवल कॉलनी, ९ लक्ष्मी प्रताप गागडे, रा.जाखनी नगर, १० फुलाबाई गणपत भाट रा. सिंधी कॉलनी, ११ रेखा सावन बांगडे रा. सिंगापूर, १२ अल्का क्राती बाटुंगे रा. कंजरवाडा, १३ यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!