क्राईम

पोलिसांच्या सतर्कतेमुळे सावद्यात होणारा मोठा अनर्थ टळला!*

पोलिसांच्या सतर्कतेमुळे सावद्यात होणारा मोठा अनर्थ टळला!*
“अकारण वाहनांची तोडफोड करून गावातील देवस्थानावर दगडफेक करणाऱ्या जमावातील समाजकंटकावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन आज दि.३० ऑक्टोबर रोजी सावदा पोलीस ठाण्यात दिलीप श्रीधर चौधरी,अमोल सुधीर चौधरी, तोहीश राजेंद्र राणे,दीपक संतोष चौधरी,सागर प्रमोद बेंडाळे इत्यादीने वाहनधारकांनी सावदा पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे.”
—————————————-
“मोबाईल द्वारे वादग्रस्त पोस्ट पसरवून धार्मिक भावना दुखवणारा तरूण व जमावातील एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.सदर प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हे दाखल केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
—————————————-

सावदा प्रतिनिधी मोहसिन शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे एका तरुणाने मोबाईलद्वारे कथित रित्या वादग्रस्त स्टेटस ठेवून मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून या विरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या जमावाला एपीआय देवीदास इंगोले यांनी सदरची वादग्रस्त पोस्टाला कारणीभूत तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याची हमी देवून शांत रहाण्याचे आवाहन केले.मात्र पोलीस ठाण्यातून परत येणाऱ्या जमावतू काही समाच कंटकानी विनाकारण गावातील नागरी वस्तीतील उभे वाहनांची अचानक पणे तोडफोड केल्याने नुकसान केला.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला.याबाबतची माहिती मिळतच वेळप्रसंगी घटनास्थळी तात्काळ एपीआय देविदास इंगोले,पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड,एएसआय महमूद शाहा,गोपनीय विभागाचे यशवंत टाहकळे,सह सर्व पोलीस स्टॉप यांनी तत्परता दाखवून होणाऱ्या मोठ्या अनर्थ टाळण्यात मोलाची भूमिका निभावून शहराचीतील वातावरण बिघडू न देण्यात मोलाची कामगिरी बजावली असून जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कमकला देखील पाचारण केले आहे. सदरील घटना दि.२९ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ९-४५ वाजेच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी CCTV footage तापासणी करून दोषींवर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे.

तसेच शहराची शांतता पूर्वीसारखी रहावी यासाठी आज संध्याकाळी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची मीटिंग देखील घेण्यात येणार असल्याची माहिती एपीआय देविदास इंगोले यांनी सांगितले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!