ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय एकता दिवस , सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

प्रतिनीधी सचीन वखारे फोटोग्राफर येवला :-

 

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय एकता दिवस , सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शासनाच्या आदेशानुसार *”राष्ट्रीय एकता दिवस”* , भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व.सरदार पटेल व स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.शिक्षक अजहर खतीब यांनी राष्ट्राची एकता कायम ठेवण्यासाठी सर्वांना आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमासाठी अजहर खतीब, गणेश सोनवणे,अंकुश सोळसे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!