आरोग्य व शिक्षण

हेरले येथे तब्बल बत्तीस वर्षांनी शाळा भरली

 

 

हेरले येथे तब्बल बत्तीस वर्षांनी शाळा भरली.

 

हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

हातकलंगले तालुक्यातील येथे हेरले हायस्कूल हेरले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी इयत्ता दहावी 1989 ते 90 या सालातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्री फुले व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या मेळाव्यात शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनी यांनी दहावीनंतर शेती ,नोकरी, व्यवसाय असे सर्वांनी आपला परिचय करुन दिला त्यावेळी विद्यार्थिनी मनोरंजनात्मक गाणी , विनोद, असे विविध प्रकारचे कला कौशल्य विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन आर. एस. कांबळे, व प्रास्ताविक प्राध्यापक प्रभुदास खाबडे यांनी केले हेरले हायस्कूलचे शिक्षक व शिक्षिका घोडके मॅडम, मगदूम मॅडम, आटपाडे सर, लांजेकर सर,आवळे सर, कोळेकर सर, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!