क्राईम

शेतकऱ्याची मोटरसायकल चोरणाऱ्या चोरटा एलसीबीच्या ताब्यात

शेतकऱ्याची मोटरसायकल चोरणाऱ्या चोरटा एलसीबीच्या ताब्यात

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेताच्या बांधावरून एका शेतकऱ्याची दुचाकी लांबविणाऱ्या संशयत आरोपीला खोटे नगरातून दुचाकी संस्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे!
त्याच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील धामणगाव शिवरातील शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली होती. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशय आरोपी जगन्नाथ सपकाळे (वय- 29) हा चोरीची दुचाकी घेऊन खोटे नगर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोहेका जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन नितीन बाविस्कर, यांनी कारवाईत करत मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता संशयत आरोपी ला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत केली आहे पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!