क्राईम

सुप्रीम कॉलनीत नवऱ्याची-बायकोला मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुप्रीम कॉलनीत नवऱ्याची-बायकोला मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात येते माहेर आलेल्या विवाहितेला मारहाण करून शिवीगाळ करत दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिस शरीफ बिस्ती ( वय-२५) रा. पोलीस कॉलनी सुप्रीम कॉलनी जळगाव, हे आपल्या पत्नीसह राहायला आहे. त्यांच्या कुटुंबी भांडणातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेल्या. दरम्यान अनिस शरीफ बिस्ती हा पत्नीच्या घरी ४ नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजता गेले असता. त्यांच्या नवरा – बायको मध्ये कुटुंबिक वाद झाला.
या वादातून अनिस बिस्ती याला राग आल्याने त्याच्या बायकोला चाप्टा बुक्क्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच बाजूला पडलेली वीट सासूच्या डोक्यात मारून जखमी केले. या प्रकरणी सासू ज्योती प्रकाश ठाकूर (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) यांच्या फिर्यादीवरून जवाई अनिस बिस्ती याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ संजय धनगर करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!