ताज्या घडामोडी

ब्रेकिंग न्यूज: एसपी प्रवीण मुंढे मुंबई शहराचे नवीन पोलीस उप- आयुक्त; व कुमार चिंता यांची बदली.

ब्रेकिंग न्यूज: एसपी प्रवीण मुंढे मुंबई शहराचे नवीन पोलीस उप- आयुक्त; व कुमार चिंता यांची बदली.

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहराचे पोलीस अधीक्षक एसपी प्रवीण मुंढे सर यांना मुंबई शहराचे नवीन पोलीस उप- आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली आहे. तर दुसरीकडे जळगाव विभागचे डीवाय. एसपी कुमार चिंता यांची अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. या निर्णयानुसार ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उर्वरित अरे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरू होती.
अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या शासन निर्णय गृह विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक यांना मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली आहे. तर दुसरीकडे जळगाव विभागचे डीवडीवाय.एसपी कुमार चिंता यांची अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली येथे बदली आहे. तर दुसरीकडे पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, यांची चंद्रपूर राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी बदली झाली आहे. यांच्यासोबत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!