ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. मध्ये विद्यार्थी व पालकांचे स्वागत..*

*एम.एस.जी.एस. मध्ये विद्यार्थी व पालकांचे स्वागत..*
*अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल व सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शाळेचा पहिला दिवस म्हणून स्वागताचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे यांच्या हस्ते विद्येची देवी सरस्वतीचे पूजन करून तसेच भागीनाथ थोरात यांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर इ.१०विच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.शिक्षक अमोल आहेर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.त्यानंतर आलेल्या सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यू कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे व सेमी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.*
*सदर कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, जीवन गाडे, भागीनाथ थोरात, मंगेश शिंदे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, अविनाश बोडारे, संतोष जाधव, जितेश व्यवहारे, सचिन घोडके, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुस्मिता देशमुख, शोभा निकम, आलिया खान, निदा फारुकी, सुषमा सोनवणे, कांचन गायकवाड, दिपाली सोनवणे, आरती जगधनेसह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता वडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अझहर खतीब यांनी केले.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!