ताज्या घडामोडी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विंचूर लासलगांवसह १६ गावे व राजापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी*

*राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विंचूर लासलगांवसह १६ गावे व राजापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी*

*विंचूर लासलगावसह १६ गावे पाणी पुरवठा योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा – छगन भुजबळ*

*लासलगाव,विंचूर,दि.१२ जून :-* लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेस रेट्रोफिटींग योजनेच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांची पाहणी करत योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विंचूर –लासलगांव सह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विचुर येथील जलशुद्धीकरण केंद्र व विंचूर लासलगांवसह १६ गांवे व राजापूरसह ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना हेडवर्क व जॅकवेलच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी उपअभियंता अजय चौधरी, वी.वी.निकम, डी.एस.साळुंखे, एस.ए.शिंदे, शाखा अभियंता पी.एस.पाटील, ए.बी.बिन्नर, सहायक अभियंता एम.बी.भांगरे, गटविकास अधिकारी महेश पाटील, कंत्राटदार डी.एस.भोळे, अनिल काळे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, भाऊसाहेब भवर, बाजार समितीचे संचालक ललित दरेकर, डॉ.श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच कुमार चव्हाण, आत्माराम दरेकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी पाहणी करत पुर आल्यानंतर योजनेचा पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी कनेक्टिंग पाईप जोडून जॅकवेल पुढे घेण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावेत. तसेच विंचूर लासलगाव सह १६ गाव योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र व विंचूर लासलगांवसह १६ गांवे व राजापूरसह ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना हेडवर्क व जॅकवेलची कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!