कृषी व व्यापार

आता पाऊस पण परीक्षा घेतोय…!”*

माजी उप मुख्यमंञी मा.श्री छगणरावजी भुजबळ साहेब यांचे अमृतमहोत्सव वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!! शुभेच्छुक नितिन जाधव ,योगेश पाटील, अमोल वाघ

———————————————————–———————————————————–**आता पाऊस पण परीक्षा घेतोय…!”*

( सर्व शेतकरी बांधवांना समर्पित  )

उन्हाळ्याच्या कडक उन्हात आपली शेती नांगरून, मेहनत मशागत करून पाऊसाची वाट आमचा शेतकरी राजा पाहतो. जसजसा जुन महिना जवळ येतो, तसतसा तो आपल्या शेतात काय पिक घायचं याची आखणी करतो.

पाऊस पडल्यानंतर शेतात तो पेरणी करतो. शेतातील पिक आपल्या लहान मुला बाळाप्रमाणे सांभाळतो, पिकांची योग्य निगा राखतो. जसजसं शेतात पिक फुलायला लागते, तसतसा आमचा बळीराजा मनात खुलून जातो.

आपल्या पिकांकडे पाहून त्याचा आनंद गगनात मावत नाही. त्याला कितीही कष्ट करावे लागले तरी तो आपल्या शेतीला कसतो, पिकवतो आणी फुलवतो. आमचा शेतकरी हा जगातील एकमेव व्यक्ती आहे की जो आपल्या शेतीला फुलवण्यासाठी वर्षाच्या सुरवातीला अक्षरशः जुगार खेळतो.. वर्षाच्या शेवटी शेतीतून किती उत्पन्न येईल याची कोणतीही शास्वती त्याला नसते.पण तरी देखील तो हा जुगार वर्षानुवर्ष खेळतोय. कधी जिंकतो कधी हारतो ….परंतु खेळणं तो काही सोडत नाही. किती मोठा आशावाद आहे हा…एवढा मोठा आशावाद जगात कोठेही शोधून सुद्धा सापडणार नाही.

शेती हा असा व्यवसाय आहे जो पावसावर अवलंबून आहे..कधी पाऊस चांगला होतो तर कधी होत नाही.तरी सुद्धा हा बळीराजा शेतीला फुलवणं काही थांबवत नाही.या वर्षी तर पावसानं हदच केली. सर्वत्र प्रचंड प्रमाणात पाऊसच पाऊस झाला.मध्यंतरीच्या काळात दोन अडीच वर्ष कोरोनाने सर्वांची कसून परीक्षा घेतली, आता पाऊस सर्वांची परीक्षा घेतोय. कोरोनाच्या काळात पाऊसाने आपल्या सर्वांसारखी थोडी विश्रांती घेतली. दोन वर्षानंतर तो सुद्धा सर्वत्र जोरदार बरसतोय.

शेतकरी जेव्हा आपल्या शेतात जातो तेव्हा शेतातील हिरवेगार पिक त्याच्याकडे आशाळभुत नजरेने पाहत असते. परंतु आज परिस्थिती विचित्र आहे. आज शेतात प्रचंड पाणीच पाणी पाहून शेतकरी मनात चिंतातूर होऊन आपल्या शेतातील पिकांकडे पाहत आहे. कारण ह्या वर्षी न भूतो न भविष्यती ..एवढा पाऊस सर्वत्र झाला. या अतिरुष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले. त्याच बरोबर शेत मजूर, गरीब , सर्वसामान्य यांचे खूप हाल झाले.

आज सर्वत्र शेती पाण्याखाली आहे. ओढे नाले, बंधारे, नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतकऱ्याची सोन्या सारखी पिके आज पाण्यात आहेत. *इंग्रजी भाषेत एक कविता आहे…’Rain rain go away, come again some another day, little Jonny wants to play…त्या ऐवजी आता ‘ Rain rain go away …Don’t come at least this year again..* अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

एवढं सगळं होऊन सुद्धा शेतकरी आपली हिंमत हारलेला नाही व त्यांने आपली जिद्द, चिकाटी आणी सहनशीलता गमावलेली नाही. कारण शेतकरी हा जगातील एकमेव असा व्यक्ती आहे जो प्रचंड हिंमतवान, सहनशील, कष्टाळू आणि मनाने खूप मोठा आहे. ज्याला अशी छोटी मोठी वादळे कधीच रोखू व हरवू शकत नाही.

कवी सुरेश भट यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे की…
*येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही..*

लेखन:-
प्रा.श्री सचिन कोल्हे पाटील
मोटीवेशनल स्पीकर,
मो.9421832376
( लेख आवडल्यास सर्व शेतकरी बांधवांना पाठवा व वरील मोबाईल नं वर आपली प्रतिक्रिया कळवा )

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!