आरोग्य व शिक्षण

यशवंतराव चौहान महाविद्यालय येथे डॉ ए.पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला…*

*यशवंतराव चौहान महाविद्यालय येथे डॉ ए.पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला…*

प्रतिनिधि करमाळा तनवीर शेख

          दिनांक 15/10/22          

करमाळा तालुक्यातील यशवंतराव चौहान महाविद्यालय येथे डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण स्वरूप हे विद्यार्थांशी निगडीत होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे विद्यार्थी मा.अबूतालिब शेख होते तसेच प्रमुख अतिथि विद्यार्थिनी सुप्रिया पवार व विद्यार्थी अमित सरवदे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी दीपाली राऊत हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी भाग्यश्री बिनवडे हिने मांडले. या वेळी अमन आरणे,रामेश्वर भरते,सूरज सुपे,साक्षी शिंदे, प्रतीक्षा पवार, अपर्णा शिंदे,अंकिता वाबळे,आणि प्राची हिंगने या विद्यार्थिनी आपले मत व्यक्त केले या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अबूतालिब शेख यानी ए पी. जे अब्दुल कलाम यांनी देशाला दिलेले योगदान या विषयी माहिती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले.
यानंतर अमृता आरणे या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळी यशवंतराव चौहान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल.बी पाटील सर तसेच उप प्राचार्य साळूंखे सर व इतर विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथालयाचे हेड रामटेके मैडम तसेच मराठीचे प्राध्यापक मोहिते सर यांचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या वेळी यशवंतराव चौहान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल.बी पाटील सर तसेच उप प्राचार्य साळूंखे सर व इतर विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथालय विभाग प्रमुख डाॅ रामटेके मैडम तसेच मराठीचे प्राध्यापक मोहिते सर यांचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!