आरोग्य व शिक्षण

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी होतील जंतापासून मुक्त…

..
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम,स्कुल अंदरसुल येथे गुरुवार दि.१३/१०/२०२२ रोजी मुलांच्या सुदृढ वाढीसाठी जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.कार्यक्रमासाठी अंदरसुल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. जयश्री पवार, डॉ.अजिंक्य गिरी, आशा गट प्रवर्तक सुनंदा परदेशी, सृष्टी कानडे या उपस्थित होत्या.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.जयश्री पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व व योग्य आहार बद्दल तसेच मुलांच्या सुदृढ वाढीसाठी व रात आंधळेपणा टाळण्यासाठी,निरोगी आयुष्यासाठी या जंत नाशक गोळ्या उपयुक्त आहे अशी माहिती दिली. इ. नर्सरी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.
याप्रसंगी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान,अजहर खतीब, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, अमोल आहेर, गणेश सोनवणे, माधुरी माळी, सुनीता वडे, शर्मिला पवार, सुश्मिता देशमुख, चेतना माकुने, आलिया खान आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!