ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शहीद दिवस साजरा.*

*एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शहीद दिवस साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शहीद दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते.कार्यक्रमाची सुरुवात भगत सिंह, शिवराम राजगुरु व सुखदेव थापर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व सहकार व शिक्षण महर्षी स्व.श्री. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. १९२८ साली ब्रिटिश अधिकारी जॉन सॉन्डर्स यांच्या हत्येच्या आरोपात भगत सिंह, शिवराम राजगुरु, सुखदेव थापर यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली होती.२३ मार्च हा दिवस “शहीद दिवस” म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वतंत्र संघर्षात भगत सिंह, शिवराम राजगुरु, सुखदेव थापर यांनी देशासाठी आपला प्राणांची आहुती दिली.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कार्याची माहिती दिली.
सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, पारस भगत, अजीम पटेल, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुष्मिता देशमुख, सुनीता वडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक अझहर खतीब यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!