ताज्या घडामोडी

ममदापूर येथील मेळाचा बंधाऱ्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी असल्याने केवळ श्रेय घेण्यासाठी काही राजकारण्यांची नागपुर वारी – प्रा.ज्ञानेश्वर दराडे* *मेळाच्या बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे सक्षम – प्रा.ज्ञानेश्वर दराडे* *मेळाचा बंधाऱ्याचा प्रस्ताव टप्पा २ च्या परवानगीसाठी केंद्रिय वने व पर्यावरण विभागाकडे प्रस्तावित असल्याने आयत्या पिठावर रेघोट्या*

*ममदापूर येथील मेळाचा बंधाऱ्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी असल्याने केवळ श्रेय घेण्यासाठी काही राजकारण्यांची नागपुर वारी – प्रा.ज्ञानेश्वर दराडे*

*मेळाच्या बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे सक्षम – प्रा.ज्ञानेश्वर दराडे*

*मेळाचा बंधाऱ्याचा प्रस्ताव टप्पा २ च्या परवानगीसाठी केंद्रिय वने व पर्यावरण विभागाकडे प्रस्तावित असल्याने आयत्या पिठावर रेघोट्या*

*नाशिक,येवला,दि.२३ मार्च :-* येवला तालुक्यातील ममदापूर परिसरातील साठवण तलाव ममदापूर या प्रकल्पाला वनविभागाकडून सप्टेंबर २०२२ मध्ये टप्पा एकची परवानगी प्राप्त झाली असून टप्पा २ च्या अंतीम परवानगीसाठी केंद्रीय वन विभागाच्या नागपुर येथील कार्यालयाला प्रस्ताव गेलेला आहे. या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे सक्षम आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावर केवळ श्रेय घेण्यासाठी काही राजकारण्यांनी नागपुर वारी केली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तथा राजापूरचे उपसरपंच प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी केले आहे.

प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी म्हटले आहे की, येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा सतत दुष्काळग्रस्त असल्याने याठिकाणची सिंचन क्षमता अधिक वाढविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून ममदापूर येथे रु ६४५.६४ लक्ष इतक्या रकमेच्या मेळाचा बंधारा या साठवण तलावाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.तसेच या कामाचा कार्यारंभ आदेश देखील देण्यात आलेला होता.
मात्र हा प्रकल्प ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असून वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्यांअभावी हे काम सुरु होऊ शकले नव्हते. या परवानग्या घेण्याची जबाबदारी या कामाच्या कंत्राटदारावर असल्याने कंत्राटदार या कामाचा नेटाने पाठपुरावा करत असून ज्या ठिकाणी प्रस्ताव जातो तिथे भुजबळ साहेब पाठपुरावा करत आहेत.

राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची मान्यता,केंद्र शासनाच्या वने आणि पर्यावरण विभागाची मान्यता आदी विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते.दि २३ मे २०२२ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला दि ६ मे २०२२ मधील मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून मान्यता दिली होती.त्यानंतर जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत या समितीने ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रातील या साठवण तलावाच्या जमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

साठवण तलाव ममदापूर हा २८.०६ हेक्टर वनजमिनीवर होणार आहे.या तलावाचे १८ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे. या बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील १७६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या साठवण तलावाचा ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांना सुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.

या योजनेची वर्क ऑर्डर नोव्हेंबर २०१७ मधील असल्याने योजनेच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे ही योजना शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करून या योजनेच्या अंदाजपत्रकाला सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठावण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समितीने प्रस्तावाची तांत्रिक छाननी करून सुप्रमा साठी शासनाला शिफारस केली.मृद् व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता यांनी या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच ही योजना शासनाकडे वर्ग करून या योजनेच्या अंदाजपत्रकाला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. ममदापुर असो की येवल्यातील सुरू असलेले कुठलाही प्रकल्प असो मंत्री छगन भुजबळ ते पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे कुणाला कुठे वाऱ्या करण्याची आवश्यकता नाही. मात्र आता केवळ निवडणुकांच्या तोंडावर श्रेय लाटण्यासाठी काही लोक आयत्या पिठावर रेघोट्या ओढत असल्याची टीका प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!