ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून रवाना….* *मंत्री छगन भुजबळ यांनी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून रवाना….*

*मंत्री छगन भुजबळ यांनी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा*

*येवला व नांदगाव मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून रवाना*

*नाशिक,येवला, मनमाड, दि.६ मार्च :-* येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे १४७६ ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून आज रात्री ८.१० मिनिटांनी रवाना झाली. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखविला.यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.

दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथून ट्रेन मध्ये सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत. नाशिक ते मनमाड त्यांच्यासमवेत प्रवास केला.


यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, पंढरीनाथ थोरे, वसंत पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, शिवाजी सुपनर, भोलाशेठ लोणारी, मोहन शेलार, दिपक लोणारी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सुनील पैठणकर, विजय खैरनार, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, दत्ता रायते, अशोक

नागरे, पांडुरंग राऊत, विलास गोऱ्हे, सुरेखा नागरे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, साहेबराव आहेर, बाळासाहेब लोखंडे, प्रसराम दराडे, संतोष खैरनार, समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा कविता कर्डक, संजय खैरनार, धीरज बच्छाव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या ‘प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास’ या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येत आहे. प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. ही ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे १४७६ ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या रवाना झाली.

नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे १४ वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचे या नगरीत वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली.

प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे २२ डब्यांची ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ ही आज दि.६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ८.१० वाजता मनमाड स्थानकातून अयोध्या कडे रवाना करण्यात आली. त्यानंतर दि.७ मार्च २०२४ रोजी रात्री ९.३० वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहचणार आहे. तर दि.८ मार्च २०२४ रोजी दुपारी ४.४० वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून दि. ९ मार्च २०२४ रोजी रात्री ८ मनमाड येथे पोहचणार आहे.

सदर प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहे. या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख २२ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!