ताज्या घडामोडी

.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.

*एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस मोठ्या उत्साहाने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे या होत्या व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील महिला शिक्षकेत्तर कर्मचारी छाया परदेशी, करूणा गायकवाड, मथुरा पैठणकर, वैशाली शिनगारे, मंगल आहेर या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, राणी लक्ष्मीबाई व मातोश्री शांताबाई सोनवणे यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका सुष्मिता देशमुख यांनी केली.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे सत्कार करण्यात आले.यानंतर नीलिमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी प्रतिक्षा देशमुख, स्नेहल देशमुख, जान्हवी देशमुख यांनी महिला दिनानिमित्त नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.शिक्षिका सुनीता वडे, शर्मिला पवार, इकरा अन्सारी, अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, तरन्नुम सैय्यद, पूनम घोंगाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच
प्रमुख पाहुणे मथुरा पैठणकर, करूणा गायकवाड व वैशाली शिनगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या नंतर शिक्षिका सोनाली साताळकर व शोभा निकम यांनी महिला दिनानिमित्त कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात सौ.विनिता अमोल सोनवणे यांनी सांगितले की प्रत्येक महिलेच्या यशामागे त्यांचे वडील, भाऊ, काका, मामा इ. घरच्यांचे सहकार्य असते व महिलांनी आपली सीमा रेषा ओलांडू नये व दिलेल्या स्वातंत्र्याचे भान ठेवावे.तसेच सर्व उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक अमोल आहेर, दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, राजेश कांबळे, सचिन घोडके, पूजा गायकवाड, सायली भालेराव, निदा फारुकी, अनिता लाचुरे, धनश्री कळांगे, मयुरी एंडाईत सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी माळी यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना एंडाईत यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!