ताज्या घडामोडी

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – मंत्री छगन भुजबळ* *शेवटपर्यंत फक्त ओबीसीसाठीच लढेल – मंत्री छगन भुजबळ*

*भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – मंत्री छगन भुजबळ*

*शेवटपर्यंत फक्त ओबीसीसाठीच लढेल – मंत्री छगन भुजबळ*

*नाशिक,येवला,दि.३ मार्च :-* ओबीसी समाजातील अनेक जातीत पोटजाती आहे. जर आपल्या आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं. तसेच ओबीसीमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोटजातीनी एकत्र येऊन भोई म्हणून एक छताखाली यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महात्मा फुले नाट्यगृह येवला येथे आज भोई समाज आरक्षण एल्गार बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

येवला आमदार नरेंद्र दराडे, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्या.चंद्रकांत मेश्राम, रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे, ज्ञानेश्वर खैरमोडे, गणेश सपकाळ, संतोष सासे, संतोष सोपे, संदीप डहाके, दिपक वाघ, योगेश आडने, संभाजी लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला कुठलाही विरोध नव्हता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी आपली मागणी होती. आता मराठा समाजाला स्वतंत्र आणि टिकणार आरक्षण देण्यात आलं आहे. तसेच ओबीसीतील सर्व घटकांनी एकत्र आले तरच प्रश्न सुटतील. तसेच देशात जातनिहाय जनगणना करणे ही आपली मागणी आहे. त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन लढल पाहिजे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भोई समाज हा राजकीय दृष्ट्या आजही दुर्लक्षित आहे. त्यामुळे भोई समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारणात यावं. समाजात पालखी उचलणाऱ्या या भोई बांधवांनी आता पालखीत बसायला शिकल पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवांना केले. तसेच भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन रोटी बेटीसह सर्व व्यवहार करत आपल्या समाजाची प्रगती करावी असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्या.चंद्रकांत मेश्राम, दौलतराव शितोळे, ज्ञानेश्वर खैरमोडे, गणेश सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!