ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस “शिवजयंती” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.शामराव घोडके (एच.ओ.डी., एम.बी.ए. संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगाव) हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.प्रमुख पाहुणे डॉ.शामराव घोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली.
याप्रसंगी शिक्षक अमोल आहेर, गणेश सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक अमोल आहेर यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!