ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. मध्ये आशीर्वाद समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.*

*एम.एस.जी.एस. मध्ये आशीर्वाद समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इ.१०वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.विनोद मालकर (डायरेक्टर, संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, कोपरगाव) व डॉ.शामराव घोडके (एच.ओ.डी., एम.बी.ए. संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगाव) हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर इ.९ वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर शिक्षक अमोल आहेर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.इ.९वी च्या विद्यार्थिनींनी शिक्षक अझहर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली “तुफान आपली यारी, ये दोस्ती हम नही तोडेंगे” हे गीत सादर केले. यानंतर संस्थाचालकांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे डॉ.विनोद मालकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आवाहन केली की इ.१० वी बोर्डाची परीक्षा ही तुमच्या भविष्याची पहिली पायरी आहे व आपण सर्वांनी आपल्या आई – वडील, शिक्षक व संस्थाचालक यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे तसेच इ.१०वी नंतर कोणते क्षेत्र निवडावे याची माहिती दिली.दुसरे प्रमुख पाहुणे डॉ.शामराव घोडके यांनी विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शन केले.त्यानंतर इ.१०वी चे विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी शाळेला डायस व इतर साहित्य भेट म्हणून दिले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक जीवन गाडे, जनार्दन जानराव, ग्रामपालिकेचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, भागीनाथ थोरात, मंगेश शिंदे, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.९वी च्या विद्यार्थिनी विनंती देवरे व आरती खैरनार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक दिपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!