ताज्या घडामोडी

अन्नसुरक्षा कायद्यानुसार लाभार्थ्यांना धान्य सुरू करा : तहसीलदार हेळकर यांना शिरोळ तालुका भाजपाचे साकडे*

*अन्नसुरक्षा कायद्यानुसार लाभार्थ्यांना धान्य सुरू करा : तहसीलदार हेळकर यांना शिरोळ तालुका भाजपाचे साकडे*

दानोळी : प्रतिनिधी-संदिप चौगुले
अन्नसुरक्षा कायद्यानुसार विभागातील लाभार्थ्यांना रेशन धान्य पुरवठा तात्काळ सुरू करा असे साकडे शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर यांना भाजपच्या जैन प्रकोष्ट शिरोळ तालुका व पंचायत राज ग्रामविकास विभागाने आज घातले. याबाबत दानोळी तालुका शिरोळ येथील पद्माकर कांबळे, जैन प्रकोष्ट चे जिल्हाध्यक्ष (पूर्व) अण्णासाहेब पाटील, भाजपा पंचायत राजचे शिरोळ तालुका अध्यक्ष मेजर प्रकाश पाटील, शिरोळ विधानसभा अध्यक्ष रवी शहापुरे यांच्यासह तेरा जणांच्या शिष्टमंडळाने तसे निवेदन तहसीलदार हेळकर यांना सादर केले.
तालुक्यातील सर्व रेशन धान्य दुकानांमधील लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा फॉर्म भरून तसेच त्यांचा 12 अंकी नंबर आला आहे तरी देखील कित्येक वर्षे या लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही, त्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे असे निवेदनात नमूद असून शिरोळ पुरवठा विभागात भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप ही शिष्टमंडळाने निवेदनात केला आहे.
अन्नसुरक्षा कायदा अधिनियमानानुसार सर्व केसरी कार्डधारकांना मोफत धान्य मिळावे अशी संकल्पना असताना देखील तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक हे मोफत मिळणाऱ्या धान्यापासून कित्येक वर्ष वंचित आहेत. सर्व केसरी कार्डधारकांना मोफत धान्य मिळणार अशी घोषणा करणे आणि प्रत्यक्षात मात्र पुरवठा विभागाचे कर्मचारी कार्डधारकांचे काम करत नाहीत. हा त्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे असाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पुरवठा विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच प्रत्येक गावातील धान्य दुकानातील कर्मचारी हे जाणून बुजून कूचकामी पणा करीत आहेत असे निदर्शनास येत आहे, सर्व रेशन कार्ड धारक पुरवठा विभागातील संबंधित दालनात वारंवार चकरा मारून मेटाकुटीला आले आहेत. तरी देखील पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना याचे काही देणे घेणे नाही, लाभार्थ्यांना ते योग्य माहितीही सांगत नाहीत.
सर्वर प्रॉब्लेम किंवा चौकशी सुरू आहे अशा प्रकारचे कारणे समोर करून गोरगरीब जनतेला नाहक मोफत धान्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र या विभागातील कर्मचारी राबवीत आहेत. 12 अंकी नंबर पाहिजे असेल तर 500 ते 700 रुपये ची चिरीमिरी मागण्याचा प्रकार करून लाभार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे.
या प्रकाराचा गांभीर्याने विचार करून सरसकट सर्व केसरी रेशन कार्ड धारकांना त्वरित धान्य पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर शासनाने जाहीर केलेल्या विविध योजना जसे की आयुष्यमान, गोल्डन कार्ड याचाही लाभ मिळत नाही. जनतेला आर्थिक संकटाला तर सामोरे जावे लागत आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर रेशन धान्य दुकानदार हे जनतेला लाभापासून वंचित ठेवण्याचे एक प्रकारे कारस्थान करीत आहेत. या सर्व बाबी शिष्टमंडळाने तहसीलदार हेळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तात्काळ धान्य पुरवठा सुरू करावा अन्यथा वंचित लाभार्थ्यांच्या मार्फत मोर्चा किंवा आंदोलनाचा इशाराही निवेदनाने दिला आहे.
या निवेदनावर जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष उमेश शंभूशेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण, पंचायत राज गणप्रमुख सुनील शिंदे, अभिजीत कांबळे, यश चौगुले, पंचायत राज संयोजक विवेक राजमाने, धनगर समाज प्रमुख अमोगोडा पाटील, हसूर पंचायत राज गणप्रमुख दीपक पाटील यांच्या सह्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!